Home बातम्या मेघालयच्या पाच पोलिसांची गनिमांकडून हत्या

मेघालयच्या पाच पोलिसांची गनिमांकडून हत्या

0

गॅरो लिबरेशन आर्मीच्या (जीएनएलए) गनिमांनी काल एका कारवाईक बांगला देशच्या सीमेनजीक असलेल्या बंजकोना भागात पाच पोलिसांची बेछूट गोळीबार करून हत्या केली.

पोलिसांचे एक पथक तुरा तुरुंगातील एका कैद्याला आणण्यासाठी जात असताना त्यांच्यावर वरील गनिमांनी हल्ला चढवला. यावेळी पोलिसांवर फेकलेल्या हात बॉंबचा स्फोट झाला नाही. गनिमांनी पोलिसांजवळील एके ४७ रायफली व काडतुसेही पळविली. मेघालयचे पोलीस प्रमुख पीटर जेम्स हनामत यांनी याविषयी माहिती दिली.