मूत्रपिंडे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील

0
51

राज्यात मूत्रपिंडे निकामी होऊन मृत्यूमुखी पडणार्‍या रुग्णांचा आकडा मोठा असून अशा रुग्णांना मूत्रपिंडे उपलब्ध करून देऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.

यासंबंधी पुढे बोलताना ते म्हणाले की रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणार्‍या व्यक्तींची मूत्रपिंडे सहा तासांच्या आत काढून ठेवली तर ज्या रुग्णांना ती ‘मॅच’ होऊ शकतील त्या रुग्णांवर ही मूत्रपिंडेरोपण करून त्याचे प्राण वाचविणे शक्य आहे. पण समाजातील सर्व घटकांनी त्यासाठी पुढे येऊन सहकार्य करावे लागेल. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी सर्वांत प्रथम सहकार्य करावे लागेल. जीव गमावलेल्या एका व्यक्तीमुळे मृत्यूपंथावर असलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचू शकतील. आरोग्यमंत्री या नात्याने हे करता आले तर त्याचा आपणाला खुप आनंद होईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.