मुसळधार पावसामुळे विमानसेवेवर परिणाम

0
5

मंगळवारी राज्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील विमानसेवेवरही विपरित परिणाम झाला. देशातील विविध भागांतून आलेली पाच विमाने खराब वातावरणामुळे दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर उतरू शकली नाहीत. ही विमाने नंतर हैदराबाद व बंगळुरू विमानतळावर उतरविण्यात आली. त्यामुळे या विमानातून गोव्यात आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. या पाच विमानातून सुमारे 800 प्रवाशी गोव्यात आले होते. बंगळुरू येथून आलेल्या विस्तारा विमानाचे गोव्याऐवजी हैदराबाद विमानळावर लँडिंग करण्यात आले, तर मुंबईहून आलेल्या इंडिगो विमानाचे हैदराबाद, बंगळुरू येथून आलेल्या अन्य एका विमानाचे पुन्हा बंगळुरू, तसेच दिल्ली व चेन्नईहून आलेली दोन विमानेही बंगळुरू येथे उतरविण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री 12 नंतर ही विमाने पुन्हा गोव्याच्या दिशेने आणून दाबोळी येथे उतरविण्यात आली.