मुसळधार पावसाने राज्याला झोडपले

0
3

चोवीस तासांत 4 इंचांची नोंद

राज्यात चोवीस तासांत 4.08 इंच अशा जोरदार पावसाची नोंद झाली आहे. फोंडा, धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. फोंडा येथे सर्वाधिक 8.69 इंच, धारबांदोडा येथे 6.66 इंच, सांगे येथे 5.64 इंच आणि काणकोण येथे 5.51 इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने येत्या 16 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेल्या दिवशी फोंडा, धारबांदोडा, सांगे, काणकोण, केपे येथे मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
चोवीस तासांत दक्षिण गोव्यातील विविध भागात जोरदार पावसाची नोंद झाली. दक्षिण गोव्यात एकूण 4.89 इंच पावसाची नोंद झाली. तर, उत्तर गोव्यात एकूण 3.16 इंच पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात म्हापसा येथे 3.85 इंच पावसाची नोंद झाली.

पडझडीच्या 26 घटना
चोवीस तासांत राज्यभरात झाडांच्या पडझडीच्या 26 घटनांची नोंद झाली आहे. भूस्खलनाच्या एका घटनेची नोंद झाली आहे. घरे, एक कार तसेच वीजवाहिन्यांवर झाडे मोडून पडल्याने सुमारे 62 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील विविध भाग्‌ा‍तील पाऊस ः म्हापसा 3.85 इंच, पेडणे 3.57 इंच, पणजी 3.56 इंच, जुने गोवा 3.37 इंच, साखळी 1.44 इंच, फोंडा 8.69 इंच, धारबांदोडा 6.66 इंच, काणकोण 5.51 इंच, दाबोली 3.33, मडगाव 3.15, मुरगाव 2.23 इंच, केपे 3.93 इंच आणि सांगे 5.64 इंच इतकी नोंद झाली आहे.