पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ हे काल खूनी हल्ल्यातून बचावले. त्यांच्या वाहनांचा ताफा निघून घेल्याचा अवघ्या काही क्षणातच शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. देशद्रोहाच्या खटल्यात आरोपी असलेल्या मुशर्रफ यांना काल फार्महाऊसमधून रावळपिंडी येथील लष्कराच्या कार्डीओलॉजी इस्पितळात नेण्यात आले होते.
ते फार्महाऊसमधून निघाल्यानंतर हा स्फोट झाला. हा बॉम्ब फूटपाथखाली सांडपाण्याच्या पाईपमध्ये लावला होता.

