मुतालिकांना प्रवेश देऊन चूक केली : जेटली

0
63
कर्नाटकात २००९मध्ये महिलांवर हल्ला करणारे श्रीरामसेनेचे प्रमोद मुतालिक यांना भाजपात प्रवेश देण्यात आला ही एक मोठी चूक होती अशी कबुली भाजप नेते अरुण जेटली यांनी दिली. रविवारी मुतालिक यांनी कर्नाटकात भाजपात प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रीय स्तरावर झालेल्या विरोधानंतर अवघ्या काही तासांतच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही त्यांच्या प्रवेशाबद्दल राष्ट्रीय नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. भाजपसाठी देशात चांगले वातावरण बनले असताना चुका घडू नयेत याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे जेटली म्हणाले. मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये एका गटाने पबमध्ये महिलांवर हल्ला केला होता. दारु पिऊन भारतीय संस्कृतीचे हनन करणार्‍या महिलांवर हल्ला रास्तच होता असे नंतर मुतालिक यांनी म्हटले होते.