मुख्य नगरनियोजक नाईक यांचे निलंबन

0
15

नगरनियोजन व नगरविकास खात्याचे मुख्य नगरनियोजक राजेश नाईक यांना दक्षता खात्याच्या सूचनेनुसार सेवेतून निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर नाईक यांना कार्मिक विभागात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजेश नाईक यांनी घेतलेल्या काही निर्णयांच्या पार्श्वभूमीवर त्यांना निलंबनाला सामोरे जावे लागल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू झालेली असून, त्याचाच भाग म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.