मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल नवी दिल्लीत भाजपचे नूतन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
नितीन नबीन यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच भेट घेतली असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दामू नाईक, भाजपचे गोवा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर, सर्वांनद भगत यांची उपस्थिती होती.
या भेटीमध्ये गोव्यातील भाजप पक्ष संघटन, राजकीय परिस्थिती, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय वाढविणे व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
नितीन नबीन यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास आणि संघटनात्मक अनुभव पक्षासाठी निश्चितच नवी दिशा देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेटीनंतर जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे.