‘मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे सुरक्षा रक्षकांचे आंदोलन मागे’

0
150

भरती रोजगार सोसायटीच्या सर्व सुरक्षा रक्षकांना सेवेत घेण्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आश्‍वासन दिले आहे. विरोधी पक्षानेही या विषयावर त्यांना पाठिंबा दिला आहे. सरकारच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून आंदोलन मागे घेतल्याचे कामगार नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषेत सांगितले. दि. ६ एप्रिल व १२ एप्रिल रोजी बैठका होईल. त्यानंतर १५ एप्रिल दरम्यान मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईल, अशी माहिती ऍड. राणे यांनी दिली.