मुख्यमंत्री सावंत कोल्हापूर – सोलापूर दौऱ्यावर

0
9

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी सोलापूर व कोल्हापूर असा दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या मित्र परिवाराने त्यांचा सोलापुरात भव्य नगरी सत्कार करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तेथे शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले असल्याने त्याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्री सावंत हे बुधवारपासून सोलापूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. खासगी चार्टर विमानाने काल त्यांनी सोलापूरकडे प्रयाण केले. काल त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहेल, पंढरपूर या तीर्थस्थळांना भेट दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री आज दि. 23 रोजी सकाळी सोलापूर विमानतळावरून खासगी चार्टर विमानाने कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. तेथे ते महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर कणेरी मठ येथील सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शन घेऊन ते कोल्हापूर येथून गोव्याकडे येतील.