Home बातम्या मुंबई हल्ल्याचा तपास अहवाल पाकिस्तान कोर्टाने फेटाळला

मुंबई हल्ल्याचा तपास अहवाल पाकिस्तान कोर्टाने फेटाळला

0

२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंबंधीचा पाकिस्तानच्या न्यायालयीन आयोगाने मुंबईत येऊन तयार केलेला तपास अहवाल काल पाकिस्तानच्या कोर्टाने फेटाळला. या आयोगाच्या तपासाविरूद्ध तेथे दाखल केलेल्या याचिकेवर रावळपिंडीच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने वरील निवाडा दिला.

या आयोगाला दहशतवाद हल्ल्यातील साक्षीदारांना भेटायला दिले गेले नाही हे बेकायदेशीर असल्याचे सांगत कोर्टाने अहवाल फेटाळला.

या हल्ल्यासंबंधी पाकिस्तानात चालू असलेल्या खटल्याचा हा तपास अहवाल भाग बनवता येणार नाही असे सांगत आयोगाने वेळ फुकट घालवल्याची टिप्पणीही कोर्टाने केली. दोन्ही देशांची सहमती बनल्यास आयोगाने पुन्हा भारतात जाऊन साक्षीदारांच्या जबान्या घ्याव्यात असा सल्लाही कोर्टाने दिला.

२००८मध्ये पाकिस्तानातून आलेल्या १० जणांनी मुंबईत हल्ला घडवून आणला होता ज्यात १६६ जण ठार झाले होते.