मुंबई विमानतळाजवळ ४ कोटींचे हेरॉईन जप्त

0
13

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण गाजत असतानाच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने आज मुंबई विमानतळ परिसरात मोठी कारवाई केली आहे. विमानतळाजवळच्या कार्गो कॉम्प्लेक्स येथून ४ कोटी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सहार येथील इंटरनॅशनल कुरियर टर्मिनलवर पार्सलद्वारे ड्रग्ज येणार असल्याची पक्की खबर एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटला मिळाली होती. त्याआधारे हा छापा टाकून तपासणी करण्यात आली. यात कार्गो कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमध्ये एका पार्सलमध्ये सफेद पावडरचे पाकीट आढळून आले.