दोघांचा शोध जारी
मुंबईत छायापत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणी काल पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. त्यांची नावे सिराज रेहमान (२५) व विजय जाधव अशी आहे. याप्रकरणी जाधव व शुक्रवारी अटक केलेल्या चांद बाबू सत्तार शेख यांना कोर्टाने ३० ऑगस्टपर्यंत पोलीस रिमांड दिला आहे. याप्रकरणी आता आणखी दोघांना अटक करणे बाकी आहे.
काल उशीरा हाती लागलेल्या सिराजला आज न्यायदंडाधिकार्यांसमोर सादर केले जाईल. दरम्यान, दोघांना काल कोर्टात आणले असता बाहेर शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना शिक्षा देण्यासाठी नारेबाजी केली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकाला भेट देऊन केसच्या प्रगतीची माहिती घेतली. सदर युवतीची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, चांद बाबू सत्तारच्या आजीने काल पोलीस स्थानकात येऊन आपला नातू हा अल्पवयीन असून निर्दोष असल्याचा दावा केला. तो १६ वर्षांचा असल्याचा पुरावा असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. मात्र चांद बाबू भुरट्या चोर्या करतो व ड्रग्स घेतो अशी माहिती शेजार्यांकडून पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी त्याचे वय १९ सांगितले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.