27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

मुंबई इंडियन्स-सनरायझर्स हैदराबाद लढत आज रंगणार

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज आयपीएलच्या १४व्या पर्वातील नववी लढत चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज रंगणार आहे.

दोन्ही संघ प्रत्येकी दोन सामने खेळलेले आहे. मुंबईला पहिल्या लढतीत आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसर्‍या लढतीत त्यांनी राजस्थान रॉयल्स संघावर मात केली होती. तर सनरायझर्सह हैदराबादला आपले दोन्ही सामने गमावावे लागलेले आहेत.

रोमहर्षक झालेल्या स्पर्धेतील शुभारंभी सामन्यात मुंबईला विराटसेनेकडून पराभव स्वीकारवा लागला होता. परंतु दुसर्‍या लढती त्यांनी कोलकाता नाइट रायडर्सला १० धावांनी पराभूत केले. या सामन्यात कोलकातचे वर्चस्व असताना लेगस्पिनर राहुल चहरच्या जादुई गोलंदाजीमुळे मुंबईने बाजू पलटवली होती. राहुलने २७ धावांत ४ गडी गारद करीत मुंबईच्या पहिल्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही प्राप्त झाला होता. आजही कर्णधार रोहितला त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा असेल. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, हार्दिक व कृणाल पंड्याही आजच्या सामन्यात गोलंदाजीच्या विभागात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावू शकतात. मॅक्रो जॅनसनही उपयुक्त गोलंदाजी करीत आहे.

फलंदाजीच्या विभारात क्वींटन डी कॉक अपयशी ठरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (४३) आणि सूर्यकुमार यादव (५६) यांनी अपेक्षित फलंदाजी करताना मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती. आता या सामन्यातही त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. क्वींटन डी कॉक, ईशान किशन, हार्दिक पंड्या आणि कीरॉन पोलार्ड चमकले तर मुंबई इंडियन्स प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठे लक्ष्य सहज उभे करू शकतात.

दुसर्‍या बाजूने ऑस्ट्रेलियन स्टार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदाराबाद आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असेल. त्यामुळे विजयी लय मिळविण्याच्या इराद्यानेच ते मैदानावर उतरतील. त्यांच्या अपयशाची कारणे ठरलीत ती म्हणजे त्यांची मध्यफळी. त्यामुळेच त्यांना लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळविणे कठीण झालेले आहे. दुसर्‍या सामन्यात तर आरसीबीला १४९ धावांवर रोखल्यानंतरही त्यांना ९ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावांपर्यंतच मजल मारता आली होती. कर्णधार वॉर्नर (५४), मनीष पांडे (३८) आणि राशीद खान (१७) यानांच दुहेरी आकडा गाठता आला होता. अन्य सर्व फलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे त्यांना ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. गोलंदाजीत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने गेल्या सामन्यात भेदक मारा केला होता. भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, राशीद खान आणि शाहबाज नदीमही चांगली गोलंदाजी करीत आहेत. हे सर्वजण चालले तर ते मुंबईसाठी कडवे आव्हान उभे करू शकतील.

मुंबई इंडियन्स (संभाव्य) ः रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, क्वींटन डी कॉक, कीरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, ट्रेंट बौल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, मार्को जेन्सेन.
सनरायझर्स हैदराबाद (संभाव्य) ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, विजय शंकर, वृध्दिमान साहा, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, शाहबाज नदीम.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

येत्या १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी डोस ः जावडेकर

येत्या पंधरा दिवसांत केंद्र सरकारकडून राज्यांना १.९२ कोटी लशींचे डोस देण्यात येतील अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिली. देशातील...