Home Featured मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी

0

मुंबई पोलीस सध्या गणेशोत्सवाच्या सुरक्षेत व्यस्त असून, त्याच दरम्यान मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. यावेळी मानवी बॉम्बबाबतची धमकी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर प्राप्त झाली आहे. 34 वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि 400 किलो आरडीएक्सचा उल्लेख या संदेशात करण्यात आला आहे. स्फोटानंतर संपूर्ण मुंबई हादरून जाईल, असेही या संदेशात म्हटले आहे. शनिवारी होणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर ही धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.