मुंबईतील नौदलाच्या गोदीत जहाजाला आग

0
55
मुंबई समुद्र किनार्‍याजवळील भारतीय नौदलाच्या गोदीत असलेल्या नोंदलाच्या ‘आयएनएस मातंग’ या जहाजाला आग लागली. समुद्रात टेहळणी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या या जहाजाला दुरुस्तीकामानिमित्त या गोदीत आणण्यात आले होते.

आग लागल्याच्या वृत्तानंतर अग्नीशामक दलाच्या बंबांना तेथे पाचारण करण्यात आले. जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणली गेली असून जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.