मुंगुल गोळीबार प्रकरणातील तिघे संशयित पोलिसांना शरण

0
14

मुंगुल गोळीबार प्रकरणातील संशयित व्हेली डिकॉस्टा, अमोघ नाईक आणि प्रकाश कारबार हे तिघे काल दुपारी पोलीस मुख्यालयात दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्यासमोर शरण आले.
यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे वकील उपस्थित होते. या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्याची संख्या 25 झाल्याचे पोलीस अधीक्षकानी सांगितले. मुंगुल-मडगाव येथे 12 ऑगस्ट रोजी पहाटे टोळीयुद्धातून युवकेश सिंग व रफिक तशान या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.