सन २०१० मधील मिर्चपूर दलित हत्याकांड प्रकरणात दिल्ली न्यायालयाने जाट समाजाच्या पंधराजणांना दोषी धरले. ७४ वर्षीय ताराचंद व त्याच्या १७ वर्षीय अपंग मुलीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी मुख्य आरोपी राजेंद्र याला दोषी धरण्यात आले आहे. ताराचंद यांच्या झोपडीस जाट समाजाच्या लोकांनी आग लावली होती.
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान जातीय दंगलीत झाले होते. या प्रकरणात आतापर्यंत १०३ जणांना अटक झाली असून त्यापैकी पाचजण अल्पवयीन आहेत. त्यापैकी ८२ जणांना निर्दोष सोडले गेले. त्यापैकी ५३ जणांविरुद्धचे आरोप सिद्ध झाले नाहीत, तर २७ जणांविरुद्ध पुरावे आढळले नाहीत. एक आरोपी अद्याप फरारीच आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण दिल्ली न्यायालयाकडे सोपवले होते. सर्व ९८ आरोपींना तिहार तुरुंगात ठेवले गेले आहे.