माविनवरील वीजघोटाळा सुनावणी जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करा

0
4

>> खंडपीठाचा जिल्हा न्यायाधीशांना आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल एका आदेशाद्वारे मंत्री माविन गुदिन्हो यांच्यावरील कथित वीज घोटाळाप्रकरणी जिल्हा न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्या न्यायालयात जलद सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. ह्या वीज घोटाळ्याची सुनावणी १५ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करावी. तसेच दर तीन महिन्यांनी सुनावणीचा अहवाल सादर केला जावा असेही खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

सुदीप ताम्हणकर यांनी या संबंधी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काल हा आदेश दिला. मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या तक्रारीवरून गुदिन्हो यांच्यावर हा खटला गुदरण्यात आला होता. गुदिन्हो यांच्यावर तेव्हा गुन्हा अन्वेषण पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता.