Home बातम्या मालवाहतूकदारांचा आजपासून बंद

मालवाहतूकदारांचा आजपासून बंद

0

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मालवाहतूक बंदाचा गोव्यावर विशेष परिणाम होणार नसल्याचे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक व महाराष्ट्रातील माल वाहतूकदारांनी वाहतूक बंद ठेवली होती. त्यामुळे राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वाढले होते. भाजी व अन्य वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण केली होती.

यावेळीही बंद यशस्वी झाल्यास सामान्य ग्राहकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जीवनावश्यक वस्तूंसाठी गोव्याला शेजारच्या राज्यांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रवेश शुल्क लागू करण्याच्या निर्णयाचा राज्यावर कसा व किती परिणाम होईल हे पुढील दोन दिवसांत स्पष्ट होऊ शकेल. गोव्यात वारंवार येणार्‍या वाहनांना प्रवेश शुल्कात सवलत देण्याचे सरकारने ठरविले असून दि. १५ पर्यंत पास पध्दत योजनेची अंमलबजावणी करण्याची सरकारची तयारी चालू आहे.