29 C
Panjim
Sunday, October 25, 2020

मालपे-पेडण्यात कोकण रेलमार्गावर बोगदा कोसळला

>> वाहतूक तीन दिवस बंद, रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलला

मुसळधार पावसामुळे मालपे रेल्वे स्थानकापासून सातशे मीटर अंतरावर असलेल्या मालपे – खाजने पेडणे येथे कोकण रेल्वे मार्गावरली बोगद्याचा भाग रात्री ३.३० च्या दरम्यान कोसळला. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने या दरम्यान रेल्वे वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

बोगदा सुरू होतो तेथून तीनशे मीटरच्या अंतरावर मुंबईकडे जाणार्‍या मार्गाचा उजवीकडील सुमारे चार मीटर बोगद्याच्या भिंतीचा भाग कोसळून रेल्वे मार्गावर माती दगड पडले. तर काही भाग हा कोसळण्याच्या स्थितीत होता.

मालपे रेल्वे स्थानकापासून पुढे असलेला हा बोगदा दीड किमी लांब असून तो खाजने गावात बाहेर पडतो. गेले तीन चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोगद्याच्या बाजूच्या भागात पाणी खेचले गेले. तसेच डोंगराळ भागातील पाणी शिरल्याने बोगद्याचा भाग कोसळला.

तीन दिवस रेल्वे बंद
सध्या माती काढण्यासाठी काल दुपारी रेल्वेकडून जेसीबी यंत्र आणण्यात आले. त्यापूर्वी सुमारे तीस मजुरांच्या मदतीने काही प्रमाणात माती बाजूला काढण्यात आली. बोगद्याचे काम हे युद्धपातळीवर सुरू असून किमान तीन दिवस तरी हे काम पूर्ण करण्यासाठी लागणार असल्याची माहिती रेल्वे अधिकारी बबन गाडगीळ यांनी दिली.
मालपे येथील बोगद्याचा भाग कोसळल्यानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा बंद करून ती पनवेल, पुणे, मिरज, मडगाव अशी वळविण्यात आल्याची माहिती श्री. गाडगीळ यांनी सांगितले. बोगद्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

कोकण रेल्वेच्या मार्गात बदल

मडुरे व मारपे-पेडणे रेल्वेमार्गावर बोगदे कोसळल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणार्‍या रेल्वेगाड्या लोंढा-मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे गाडी क्र. ०२६१७ ही एर्नाकुलम निजामुद्दीन सुपर फास्ट जलद गाडी मडगाव रेल्वेस्थानकावरून लोंढा, मिरज, पुणे, पनवेल, कल्याणमार्गे वळविली. गाडी क्रमांक ०६३४६ तिरुअनंतपूरम लोकमान्य टिळक मडगाव येथून लोंढा ते मिरज, पुणे, पनवेलमार्गे, ०२४३२ नवी दिल्ली ते तिरुअनंतपूरम राजधानी स्पेशल गाडी पनवेल, पुणे, मिरज, लोंढा, मडगाव वळविली.

क्रमांक ०६३४५ लोकमान्य टिळक ते तिरुअनंतपूरम सेंट्रल पनवेल, पुणे मिरज, लोंढा ते मडगाव मार्गे वळविण्यात आली. पेडणे येथे माती उपसून मार्ग खुला करण्याचे काम सुरू आहे. काल केसरलॉक ते करंजाळे अशा मार्गावर दरड कोसळून रेल्वे वाहतूक अडकून राहिली. दिल्ली येथून मडगाव येथे येणारी गाडी केसरलॉक रेल्वे स्थानकावर ठेवून जेवणासाठीची व्यवस्था केली व रेल्वेतील प्रवाशांना बसने गोव्यात आणण्यात आले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वैज्ञानिक दृष्टिकोन व आत्मनिर्भर भारत

प्रदीप गोविंद मसुरकर(मुख्याध्यापक) प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि आवडीनिवडी असतात. त्याप्रमाणे आम्ही डोळसपणे वातावरणनिर्मिती केल्यास ते चांगले वक्ते,...

रंग पत्रांचे…

सौ. प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव-वाळपई) पत्र ते पत्रच. त्याची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी...

थोडं मुक्त.. थोडं बद्ध..

सौ. माधुरी रं. शे. उसगावकर(फोंडा) स्त्रीने खरं तर स्त्रीच असावं. तिने पुरुषाप्रमाणे वागूच नये. जुन्या चालीरीती झुगारून देऊ...

अपरिहार्य

गंभीर आर्थिक संकटाला सतत सामोरे जात असलेल्या राज्य सरकारने अखेर लाडली लक्ष्मी या आपल्या लोकप्रिय योजनेसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांवरून...

ALSO IN THIS SECTION

प्लाझ्मा उपचार पद्धती चालूच ठेवणार

>> आरोग्यमंत्र्यांची माहिती, २६३ जणांवर प्लाझ्मा थेरपी गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा बराच फायदा होत...

गृहआधार योजनेसाठी दरवर्षी उत्पन्न, हयात दाखल्याची सक्ती

>> महिला, बाल कल्याण खात्याचा निर्णय महिला आणि बाल कल्याण खात्याने गृहआधार योजनेच्या लाभार्थींंना दरवर्षी उत्पन्न आणि हयात दाखला...

मध्यप्रदेशातील कोळसा खाणीसाठी सल्लागार कंपनीची निवड ः मुख्यमंत्री

>> पीपीपी सुकाणू समितीच्या बैठकीत निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील पीपीपी सुकाणू समितीच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत...

लुटणार्‍यांना पुन्हा संधी नको ः मोदी

>> बिहारमध्ये पंतप्रधानांच्या तीन प्रचार सभा बिहारला लुटणार्‍या लोकांना पुन्हा राज्यात संधी देऊ नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी...

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रीतसर प्रवेश

भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसे यांनी काल शुक्रवारी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत रीतसर प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील...