मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार

0
33

नैऋत्य मान्सून परतण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गोव्यात सुध्दा पाऊस पडत आहे. राज्यात मागील दोन दिवसात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. देशातून मोसमी पाऊस परतीला पश्चिम राजस्थानमधून 14 सप्टेंबरला प्रारंभ झाला आहे. तथापि, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीच्या पावसाची गती मंदावली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोसमी पावसाच्या परतीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. गोव्यातून साधारण 10-12 ऑक्टोबरच्या दरम्यान मोसमी पाऊस निरोप घेतो.