माध्यान्ह आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याचे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी काय करता येईल यासंबंधी चर्चा करण्यासाठी आपण २४ रोजी शिक्षण अधिकार्यांसोबत बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काणकोण येथील विद्यालयात माध्यान्ह आहार घेतल्यानंतर खरे म्हणजे केवळ एकाच विद्यार्थ्याला पोटदुखीचा त्रास झाला होता. त्याने तशी तक्रार केल्यानंतर अनेक मुले घाबरली, असे पर्रीकर म्हणाले.
माध्यान्ह आहारासंबंधी पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे आपण आता पैसेही वाढवून दिल्याचे त्यांनी सांगितले. आहार तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आपण कधीच घेतला नव्हता असे ते म्हणाले.
माध्यान्ह आहार, शालेय वेळेसंबंधी उद्या बैठक
पणजी (प्रतिनिधी)
माध्यान्ह आहार पुरविणार्या स्वयंसहाय्य गटांची बैठक उद्या बुधवार दि. २४ रोजी पर्वरी येथील शिक्षण संचालनालयात बोलावण्यात आली आहे तर शालेय वेळ वाढविण्याच्या प्रश्नावरही पालकांबरोबरही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उद्याच बैठक घेतील. त्यामुळे वरील दोन्ही विषयांवर उद्याच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
माध्यान्ह आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या प्रकारामुळे शिक्षण अधिकार्यांचीही तारांबळ उडाली आहे. त्यामुळे सरकारने या योजनेत सुधारणा घडवून आणण्याचे ठरविले आहे. त्यासाठी काहीकाळ वरील योजना स्थगित ठेवण्याचाही सरकारचा विचार आहे.
शालेय वेळ वाढविण्याच्या निर्णयामुळेही बहुसंख्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रश्नावर पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांनी पालकांच्या सूचना ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे ठरविले आहे. दरम्यान, माध्यान्ह आहार योजनेची फेररचना करण्याच्या सरकारच्या धोरणामुळे अनेक स्वयंसहाय्य गट नाराज बनले आहेत.