Home बातम्या माध्यान्ह आहाराची पुन्हा बाधा

माध्यान्ह आहाराची पुन्हा बाधा

0

पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर सात विद्यार्थ्यांना हॉस्पिसियुत नेण्यात आले तर पाच मुलांना खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. उशीरा संध्याकाळी सर्व मुलांना डिस्चार्ज दिल्याचे कळते.

मुख्याध्यापक फ्रांसिस गोयस यांनी माहिती देताना सांगितले की, मुलांना दोन डब्यांतून माध्यान्ह आहार पुरविण्यात आला होता. पहिल्या डब्यातील भाजी खाल्लेल्या मुलांनी पोटात दुखत असल्याची तक्रार केली. मात्र पाल दुसर्‍या डब्यात होती व ते निदर्शनास आल्यानंतर त्यातील भाजी वितरित करण्यापासून रोखण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविणार्‍या स्वयंसहाय्य गटाचे प्रमुख जालन देसाई यांच्याविरुद्ध भा.दं.सं.च्या कलम ३३६ खाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक वामन तारी यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.

माध्यान्ह आहाराविषयी चौकशीचे आदेश : शिक्षणमंत्री

विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या माध्यान्ह आहारांत पाली वगैरे सापडण्याचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर चौकशीचे आदेश दिले असून लवकरच अहवाल हाती येईल असे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात यांनी सांगितले. हे प्रकार वारंवार घडत आहेत त्यामागची कारणे शोधून काढण्यात येणार आहेत.