प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे हा जागतिक सिद्धांत आहे. आपण घरी चिकन-मटन खातो म्हणून जन्माला आलेल्या बालकाला ते दिले तर काय होईल. त्याला मातेच्याच दुधाची गरज असते, असे वाघ यांनी सांगितले. माध्यमप्रश्नावर जनतेला दिलेले वचन मागे घेता येणार नाही, असे ते म्हणाले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे काय झाले हे नायजेरियन लोकांनी रस्त्यावर येऊन दाखवून दिले आहे. पोलिसांनी त्यांना पळून जाण्यास मदत केली. मात्र स्थानिक टॅक्सीवाल्यांवर दंडुके उभारले गेले असे वाघ यांनी सांगितले.
कोलमडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आपणही बळी आहे; परंतु विधानसभेत स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी आपण आलेलो नाही. जनतेचे प्रश्न मांडणे हे आद्य कर्तव्य असल्याचे वाघ यांनी सांगितले.