माधव खट्टर याचीजामिनावर सुटका

0
8

सेंट फ्रान्सीस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरणात गोवा पोलिसांनी अटक केलेल्या गौतम खट्टर याचा बंधू माधव खट्टर याची काल कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. वास्को येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने संशयित आरोपी माधव खट्टर याला सशर्त जामीन मंगळवारी मंजूर केला होता. 10 हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि एका हमीदारावर माधव खट्टर याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.