कोंकण रेल्वे पोलीस व म्हापसा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व दोन्ही मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
पेडे–म्हापसा येथे राहणारी सारीका राजेश पेडणेकर ही आपल्या मुलासह नेवरा येथे माहेरी गेली होती. काल सकाळी ९ वाजता मयत सारीका हिच्या भावाने बहिणीला व भाच्याला मोटारसायकलने नेवराहून डिचोली येथे आणून सोडले. तेथून ती आपल्या मुलासह थिवी येथे रेल्वे स्थानकावर आली व आत्महत्या केली असा अंदाज आहे.
म्हापसा पोलिसांना याबाबत काल सकाळी सकाळी १० वाजता माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली व हा परिसर कोकण रेल्वेच्या परिसरात येत असल्याने म्हापसा पोलिसांनी याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
त्यावर रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तगुरू सावंत हे आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळी गेले व म्हापसा पोलीस व कोंकण रेल्वे पोलीस यांनी पंचनामा केला.
कोकण रेल्वे मडगाव स्थानकाचेउपअधीक्षक सॅमी तावारिस यांनीही घटनास्थळी येऊन पहाणी केली व दोन्ही मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविले. पुढील तपास सॅमी तावारिस करीत आहेत.
सकाळी मयत सारीका आपल्या मुलासहीत माहेरहून घरी येण्यासाठी निघताना आपल्या वडलांच्या पाया पडून बाहेर निघाली होती. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार ती माहेरहून पडताना कधीही वडीलांच्या पाया पडत नव्हती असे कळते. आत्महत्येचे नेकके कारण समजू शकलेले नाही.

