मातृभूमी’ पुरस्कार रविवारी आचार्य बाळकृष्ण यांना प्रदान

0
15

लोकमान्य मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे वार्षिक दिल्या जाणाऱ्या लोकमान्य मातृभूमी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम यावर्षी गोव्यात होणार असून, पणजी येथे रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी येथील आझाद मैदानावर पतंजलीचे संस्थापक स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत पतंजली आयुर्वेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पणजी येथे सायंकाळी 5 वाजता होणार असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. मातृभूमी पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये, शाल, श्रीफळ, मानपत्र, खास चषक तथा स्मृतिचिन्ह असे आहे.