दि. २१ रोजी हा मातृभाषा दिन आहे. त्यामुळे केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना परिपत्रक पाठवून वरील दिवस साजरा करण्याचा व कार्यक्रमाविषयी मंत्रालयाला माहिती सादर करण्यास सांगितले होते. परंतु २१ रोजी राज्यातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेत वरील दिन साजरा केल्याचे वृत्त नाही. दरवर्षी मानव संसाधन मंत्रालय अशा प्रकारची परिपत्रके पाठवते. संबंधित संस्था पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष करतात. काल दि. २१ हा रविवार सुटीचा दिवस त्यामुळे हा दिवस साजरा करण्याचा कोणी विचारही केला नाही. संबंधित अधिकार्यांना या बाबतीत विचारले असता ते गोंधळले. मातृभाषा हा महत्वाचा विषय असल्याने जगभर हा दिवस साजरा केला जातो. असे, असतानाही राज्यात या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे स्पष्ट झाले आहे.

