‘माझे ड्रायव्हर’ ॲपचा आज शुभारंभ

0
10

मोटारसायकल, टॅक्सी सेवेचे आधुनिकीकरण होणार

राज्यातील पारंपरिक मोटरसायकल टॅक्सी सेवेच्या आधुनिकीकरणासाठी ‘माझे ड्रायव्हर’ हे ॲप विकसित करण्यात आले असून या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना गोव्यातील कोणत्याही ठिकाणाहून मोटर सायकल टॅक्सी बूक करता येणार आहे. आता, मोटरसायकल पायटलसाठी स्टॅंडवर जाण्याची गरज भासणार नाही. या ‘माझे ड्रायव्हर ॲप’चा शुभारंभ आज सोमवार 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात करण्यात येणार आहे.

राज्यात गेल्या कित्येक वर्षापासून मोटरसायकल पायलट सेवा कार्यरत आहे. ही पायलट सेवा अनेकांची महत्त्वाची वाहतूक सेवा बनलेली आहे. ही पारंपरिक मोटरसायकल पायटल सेवा टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. आता, या सेवेला आधुनिकीरणाशी जोडण्यात येत आहे. ॲपच्या माध्यमातून मोटरसायकल सेवेसाठी कुठल्याही भागातून बुकिंग केले जाऊ शकते. मोटरसायकल पायटलसाठी स्टँडवर जाण्याची गरज भासणार नाही. ॲपवर बुकिंग केल्यानंतर जवळचा पायलट उपलब्ध होणार आहे. हा अप ग्रेसफुल गोवा सुपर ॲप प्रा. लिमिटेडने विकसित केला आहे. मोटरसायकल सेवेची उपलब्धता वाढवणे, ग्राहकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचणे आणि चालकांना पारंपरिक टॅक्सी स्टँड्सच्या पलीकडे जाऊन प्रवासाच्या (ट्रिप्सच्या) अधिक संधी मिळवून देणे या उद्देशांनी हे प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. हा उपक्रम गोवा मोटर सायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनच्या सहकार्याने सुरू केला जात आहे. तसेच, या सहकार्याद्वारे भविष्यात पारंपरिक मोटारसायकलींद्वारे इलेक्ट्रिक दुचाकीकडे होणाऱ्या स्थित्यंतरासाठी साहाय्य करण्याचे आणि शाश्वत वाहतूक पर्यायांना प्रोत्साहन देण्याचेही नियोजन आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, वाहतूक सचिव महेशकुमार शंभू, वाहतूक संचालक अरविंद खुटकर, गोवा मोटर सायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, रेबेका लोबो आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.