‘माझे घर’विषयी आज आढावा बैठक

0
6

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पर्वरी येथे मंत्रालयात माझे घर योजनेच्या अंमलबजावणीच्या विषयावर एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला महसूल खात्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पंचायत संचालक, नगरपालिका संचालक, मामलेदार, गटविकास अधिकारी, कोमुनिदाद प्रशासक आदी उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारच्या माझे घर योजनेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 4 ऑक्टोबरला प्रारंभ करण्यात आला होता.