माजी हवाई दलप्रमुखांची सीबीआयकडून जबानी

0
62

 हेलिकॉप्टर सौदा घोटाळा

सध्या गाजत असलेल्या ३६०० कोटी रु.च्या अतिमहनीय व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर सौदा घोटाळाप्रकरणी काल सीबीआयने माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी व त्यांच्या चुलत भावंडांची बरेच तास चौकशी केली.

काल दुपारी त्यागीना सीबीआय मुख्यालयात बोलावून सुमारे २ तास जबानी घेण्यात आली. यावेळी जुली व डोक्सा ही त्यांची चुलत भावंडे बोलावण्यात आली होती. हेलिकॉप्टर सौद्यातील युरोपीयन मध्यस्थ कार्लो गेरोसा व गिडो हशखे यांच्याबद्दल त्यांना प्रश्‍न विचारण्यात आल्याचे कळते. सौद्याच्या निविदेत बदल करायला लावल्याचा आरोप त्यागी बांधूंवर आहे. दरम्यान, त्यांनी हा आरोप फेटाळला आहे. या हेलिकॉप्टर सौद्यासाठी भारतात रु. ३६२ कोटी लाच वितरित झाल्याचा आरोप आहे.