माजी राज्य क्रिकेटपटू फेर्दिनांद कुएल्होंचे निधन

0
155

माजी प्रतिभावान राज्य क्रिकेटपटू फेर्दिनांद कुएल्हो यांचे काल शुक्रवारी मडगाव येथील एका खासगी इस्पितळात अल्पआजाराने निधन झाले. फेर्दिनांद यांना गोव्याच्या क्रिकेट वर्तुळात ‘फेर्डी’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अंडर-२१ व अंडर-२१ क्रिकेट स्पर्धांमध्ये गोवा क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व केले होते. गोव्याकडून ते दोन एकदिवसीय मर्यादित षट्‌कांचे सामनेही खेळले होते.

एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून परिचित असलेल्या फेर्दिनांद यांनी भाटिकर मॉडेल हायस्कूलमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीस सुरुवात केली होती. क्रिकेट बरोबरच शालेय स्तरावर त्यांनी बॅडमिंटन आणि कॅमरमध्येही वर्चस्व गाजवले होते. त्यांनी पश्‍चिम आंतर विद्यापीठ आणि क्रिकेट स्पर्धेत गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच ते अखिल भारतीय आर्लेम चषक क्रिकेट स्पर्धेतही नामवंत क्रिकेपटूंविरुद्ध खेळले होते. मडगाव क्रिकेट क्लबचे (एमसीसी) कोषाध्यक्ष म्हणूनही त्यांनी तीन वेळा काम पाहिले होते.