Home बातम्या मांडवी पुलाखाली मानवी सांगाडा सापडला

मांडवी पुलाखाली मानवी सांगाडा सापडला

0

मांडवी पुलाखालील (मालीम बाजूला) पोकळीत अज्ञात मानवी सांगाडा काल पोलिसांना सापडला. तेथे सांगाडा असल्याची खबर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंता गौरीश नाडकर्णी यांनी काल पर्वरी पोलिसांना दिली.

निरीक्षक मनोज म्हार्दोळकर आणि उपनिरीक्षक विलेश दुर्भाटकर आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळी गेले असता त्यांना मांडवी पुलाखालील (मालीम बाजूला) पोकळीत अज्ञात व्यक्तीचा मानवी सांगाडा आढळला. हवालदार संदीप घोगळे यांनी पंचनामा केला.