25 C
Panjim
Monday, August 2, 2021

महिलांच्या क्रिकेटशी छेडछाड करू नका

>> शिखा पांडेचे आयसीसीला आवाहन

महिलांचे क्रिकेट अधिक रंगतदार करण्यासाठी लहान आकाराचा चेंडू व कमी लांबीच्या खेळपट्टीची आवश्यकता नसल्याचे टीम इंडियाची प्रमुख मध्यमगती गोलंदाज शिखा पांडे हिने सांगितले. अनावश्यक बदल न करण्याचे आवाहनही तिने आयसीसीला केले.

सोफी डिव्हाईन व भारताची फलंदाज जेमिमा रॉड्रिगीस यांचा समावेश असलेल्या आयसीसी वेबिनारपूर्वी शिखाने अनेक ट्विट्‌स करत आपले मत मांडले. शिखा ही झुलन गोस्वामी हिच्यानंतर भारताची दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत यशस्वी मध्यमगती गोलंदाज आहे. ‘क्रिकेट रंगतदार करण्यासाठी बदल होणार असल्याचे अनेक बातम्या वाचनात आल्या. क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी व अधिक आकर्षक करण्यासाठी बदल विचाराधीन असल्याचे अनेकांकडून ऐकले, परंतु, बदलाची गरज नाही.’ असे हवाई दलात अधिकारी पदावर असलेल्या शिखाने सांगितले. शिखाच्या नावावर १०४ वनडे सामन्यांत ११३ बळींची नोंद आहे. आपले म्हणणे मांडताना शिखाने १०० मीटर धावणे व २० यार्ड (संभाव्य) खेळपट्टीची तुलना केली. ऑलिंपिकमध्ये महिला धावपटूला पुरुष खेळाडूंप्रमाणेच १०० मीटर धावावे लागते. पुरुष खेळाडूने १०० मीटरसाठी नोंदविलेली वेळ ग्राह्य धरली जाते. महिला असल्यामुळे तिला ८० मीटर धावून तिने नोंदविलेल्या वेळेची पुरुष खेळाडूची तुलना केली जात नाही, असे शिखाने सांगितले. शिखाने चेंडूचा आकार लहान करण्याला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत वजनामध्ये छेडछाड केली तर मात्र याचे गंभीर परिणाम गोलंदाजांना भोगावे लागतील, असे शिखाला वाटते. महिलांचे क्रिकेट हळुहळू आकार घेत आहे. महिला खेळाडू मोठे फटके खेळू शकत नाहीत हे ठरवून सीमारेषेचे अंतर कमी करण्यालादेखील शिखाने विरोध दर्शवला आहे. महिला क्रिकेट अधिक रंगतदार बनवायचे असेल तर सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करा. डीआरएस, स्निको, हॉटस्पॉट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करा. तळागाळातून क्रिकेटपटू तयार करण्यासाठी ‘ग्रासरुट’मध्ये अधिक गुंतवणूक करा, असे आवाहनही शिखाने केले.

महिला व पुरुषांच्या क्रिकेटची तुलना न करण्याचे आवाहनही शिखाने केले. ८ मार्च रोजी एमसीजीवर महिला टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर ८६,१७४ लोक उपस्थित होते. परंतु, हा केवळ अपवाद झाला. भविष्यात मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते महिलांच्या सर्वच सामन्यांना हजेरी लावतील, असा विश्‍वासही तिने व्यक्त केला.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चातुर्मास ः उत्सव विशेष

अंजली आमोणकर चातुर्मासात सर्वच गोष्टी आपापसावर अवलंबून असल्याने यापायी नकळत देशाची आर्थिक स्थिती सुधारते. असा हा मनस्वास्थ्य देणारा,...

पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकिर्दीचा लेखाजोखा

अरविंद व्यं. गोखले(ज्येष्ठ संपादक) ज्येष्ठ पत्रकार श्री. वामन सुभा प्रभू यांच्या ‘द ऍक्सिडेंटल जर्नालिस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन हिमाचल प्रदेशचे...

आणखी एक बँक बुडाली

दिवसागणिक बुडीत खात्यात चाललेल्या मडगाव अर्बन सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्दबातल करून रिझर्व्ह बँकेने नुकताच निर्णायक दणका दिला. पुढच्याच वर्षी ही बँक...

खनिज विकास महामंडळ विधेयक संमत

>> विरोधकांचा सभात्याग >> विधानसभेत १८ विधेयके चर्चेविनाच संमत राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू होण्याच्या...

पुरामुळे घरे कोसळलेल्यांना १५ ऑगस्टपूर्वी भरपाई : मुख्यमंत्री

हल्लीच आलेल्या पुरामुळे राज्यात ज्या लोकांची घरे कोसळली त्यांना १५ ऑगस्टपूर्वी घरे बांधण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी...

ALSO IN THIS SECTION

खनिज विकास महामंडळ विधेयक संमत

>> विरोधकांचा सभात्याग >> विधानसभेत १८ विधेयके चर्चेविनाच संमत राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू होण्याच्या...

पुरामुळे घरे कोसळलेल्यांना १५ ऑगस्टपूर्वी भरपाई : मुख्यमंत्री

हल्लीच आलेल्या पुरामुळे राज्यात ज्या लोकांची घरे कोसळली त्यांना १५ ऑगस्टपूर्वी घरे बांधण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी...

कोळसा प्रश्‍नावरून गदारोळ

>> विधानसभेचे कामकाज दीड तास तहकूब गोव्याला मिळालेल्या कोळशाच्या पट्ट्यासंबंधी विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर न देता तो प्रश्‍न...

कोरोनाने २ मृत्यू, १५२ बाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात एकूण ४३२२ स्वॅबच्या चाचण्या केल्या असता त्यात १५२ चाचण्या...

विद्याधीशतीर्थ स्वामींचे पीठारोहण भक्तिभावाने

५४० वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४वे स्वामी महाराज म्हणून श्र्‌रीमद् विद्याधीश श्र्‌रीपाद वडेरतीर्थ स्वामी महाराजांनी काल शुक्रवारी...