पणजी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. 27 मार्च रोजी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पदांसाठी सोमवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक घेतली जाणार आहे. पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या गटाचे 30 पैकी 27 उमेदवार निवडून आले आहेत, तर विरोधी गटाचे केवळ 3 नगरसेवक निवडून आले आहेत. मोन्सेरात गटाकडून महापौरपदासाठी रोहित मोन्सेरात आणि उपमहापौरपदासाठी वसंत आगशीकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. विरोधी गटाकडून या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यास महापौर आणि उपमहापौर यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. विरोधी गटात केवळ 3 नगरसेवक असून, त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत अजूनपर्यंत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

