राष्ट्रपतींची हाक
देशातील महागड्या आणी दीर्घकालीन न्याय व्यवस्थेमुळे देशातील जनतेत अस्वस्थता असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी वाद मिटविण्यासाठी मध्यस्थीसारखे पर्यायी मार्ग वापरले पाहिजेत, असेही ते म्हणाले
आपल्या देशात मजबूत, स्वतंत्र आणि निपक्षपाती अशी न्याय व्यवस्था आहे. हे जरी खरे असले तरी ती महागडी व दीर्घकालीन आहे. त्यामुळे तसेच किचकट कायद्यांमुळे लोकांत कमालीची अस्वस्थता आहे, असेही ते म्हणाले. मध्यस्थीला जर न्याय प्रक्रियेशी संबंधित करता आले व महत्त्वाचे स्थान देता आले तर आपण सामान्य जनांचे कल्याण करू शकू असेही राष्ट्रपतींनी नमूद केले. मध्यस्थीच्या प्रक्रियेबाबत तळागाळात जागृती झाली पाहिजे असे त्यांनी आवर्जुन सांगितले. ते ‘मध्यस्थी’ विषयावरील एका चर्चासत्रात बोलत होते. यावेळी सरन्यायाधीश न्या. अल्तमास कबीर व इतर विविध न्यायालयांचे न्यायमूर्ती उपस्थित होते.