मळा पुलाच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन

0
75

ईडीसी पाटो प्लाझा आणि मळा नेवगीनगर या भागाना जोडणार्‍या रूई द ओरम खाडीवरील नवीन पूलाच्या पहिल्या टप्प्याचे संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

रूई द ओरम खाडीवर अंदाजे २४ कोटी रूपये खर्चून नवीन चौपदरी पूलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात एका बाजूच्या दुपदरी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या पुलासाठी जोडरस्ते तयार करण्यात आले आहेत.