मल्लिकार्जुन खर्गेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

0
9

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे काल दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले असून, ते दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर, भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘वंदे मातरम्‌‍’चा अवमान केल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्याविरोधात निदर्शने केली आणि त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दाबोळी विमानतळावर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊन राजकीय नाट्य घडले; मात्र पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.