Home बातम्या मला नमोनिया झालेला नाही : यशवंत सिन्हा

मला नमोनिया झालेला नाही : यशवंत सिन्हा

0

आपल्याला नमोनियाझालेला नाही अशी टिप्पणी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी येथे काल त्यांना गोव्यातील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतील अनुपस्थितीबद्दल पत्रकारांनी छेडले असता केली. मला नमोनियाझालेला नाही. माझी तब्येत ठणठणीत आहे; परंतु गोव्याला न जाण्याची अन्य काही कारणेही असू शकतात, असे सिन्हा म्हणाले.

या संदर्भात पत्रकारांनी त्यांना हवे ते तर्क काढावेत असेही त्यांनी यावेळी सुनावले. सिन्हा यांनी याआधी नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणण्यास पाठिंबा दर्शविला होता.