मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

0
5

>> प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची माहिती

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते. त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्‍चित मानली जात होती. लातुरच्या उदगीर येथे आगामी साहित्य संमेलन पार पडणार आहे.

यापुढच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘चालता- बोलता’ हवा, अशी अपेक्षा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या संमेलनात व्यक्त केली होती. ती अपेक्षा लगेच उदगीरच्या संमेलनात पूर्ण झाली आहे. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी काल उदगीर येथे महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत भारत सासणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब झाले.