मराठी भवनसाठी हरमलकर यांचे मराठीप्रेमींना साकडे

0
105

गोमंतक मराठी अकादमीचे कार्य ठप्प
गोमंतक मराठी अकादमी व तिचे कार्य या विषयाची माहिती समस्त गोमंतकीय मराठी भाषिक जनतेला आहे. मराठी अकादमीचे अनुदान सरकारने बंद करून अडीच वर्षे होत आली. त्यामुळे मराठी अकादमीचे कार्य तथा सर्व कार्यक्रम ठप्प झाले आहे, याकडे अकादमीचे अध्यक्ष संजय हरमलकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे. मराठी अकादमी ही समस्त गोमंतकीयाची संस्था असल्याने या अकादमीच्या कार्यासंबंधी आणि अपूर्ण असलेल्या मराठी भवनाचे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने मराठी भाषिकांना काय वाटते यासंबंधीच्या सूचना, मराठी भाषिकांनी, मराठीप्रेमींनी आमसभा सदस्यांनी लिखित स्वरुपात अध्यक्ष, गोमंतक मराठी अकादमी, मराठी भवन, आल्त पर्वरी, बार्देश-गोवा पिकनोड (४०३५२१) या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन हरमलकर यांनी केले आहे. सूचना सोबत आपला पूर्ण पत्ता दूरध्वनी / भ्रमणध्वनी कम्रांक द्यावा किंवा दूरध्वनीवरून आपल्याला भेटून सूचना मांडाव्यात. दूर. क्र. (९३२६११७१३३) असे आवाहनही हरमलकर यांनी केले आहे.