26.3 C
Panjim
Saturday, September 26, 2020

मरणोत्तर क्रिया विधीला न्याय देणारे… पुरोहित विश्वनाथ भांडणकर

– गोविंद वि. खानोेलकर (होंडा-सत्तरी)

विश्वनाथ भांडणकर हे नुसते पुरोहित नाहीत तर चांगले बागायतदार आहेत. दूध उत्पादक आहेत. ते पुरोहित नसते तर कदाचित चांगले इंजिनियरही बनले असते, हे त्यांच्या एकूण कल्पकतेवरून कळून चुकते. डोंगरावरचे पाणी मोठ्या कुशलतेने त्यांनी आणले आहे. अनेक ग्रंथांचे वाचन त्याचबरोबर भौगोेलिक परिस्थितीचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे.

मनुष्य तसेच इतर प्राण्यांना मरण हे चुकलेच नाही. माणूस जन्माला येताना जसा नंगा येतो तसाच तो मृत्यूनंतर नंगा जातो. पण बर्‍याच माणसांना याची कल्पना नसते.
जन्मानंतर जसे अनेक विधी केले जातात त्याचप्रमाणे मृत्यूनंतर मरणक्रियेनंतर विधी करणे महत्त्वाचे असते. अशा या क्रियाविधीला न्याय देणारे एक नामवंत पुरोहित म्हणजे विश्वनाथ भांडणकर!
भांडणकर यांचा जन्म ७ जून १९५९ साली आगापूर (अगस्थीपूर) फोंडा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आगापूर येथे, माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कूल, कवळे येथे तर कॉलेजचे शिक्षण दामोदर कॉलेज, मडगाव येथे झाले. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणे बालपणातच ते गैर व क्रूर रीतीरिवाजांच्या विरुद्ध होते. कॉलेज शिक्षणानंतर महाराष्ट्र पाठ्य पुस्तक मंडळ, पुणे तसेच सहकारी छापखाना फोंडा येथे नोकरी केली. पण नोकरीत त्यांचे मन रमेना.
त्यांनी शिक्षणाबरोबर आपले वडील विष्णू भांडणकर यांच्याकडून पौरोहित्याचे धडे घेतले. शिकेरकर गुरुजींकडून आध्यात्मिक शिक्षण घेतले. विविध धार्मिक विधींबरोबर मरणोत्तर क्रिया विधीस त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने न्याय दिला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
१९८३ साली विश्वनाथ यांच्या वडलांचे देहावसान झाले. तेव्हापासून विश्वनाथ यांच्यावर पौरोहित्याची जबाबदारी पडली. वडिलांच्या मृत्यूच्या १६ व्या दिवशी त्यांना (२२ जुलै १९८३) पहिली अंतविधी क्रिया आडपई गावात करावी लागली. तेव्हापासून आतापर्यंत काणकोणपासून पेडणेपर्यंत कुठेही अंतविधीसाठी ते पौरोहित्य करतात. आतापर्यंत त्यांनी ७८६९ अंतविधी केले आहेत. विश्वनाथ भांडणकर हे चांगले विद्वान पुरोहित असून अनेक ठिकाणी देवतांच्या स्थापना, कलश स्थापना व अन्य धार्मिक कार्ये केलेली आहेत. रासई (लोटली) येथील लक्ष्मी देवस्थानचे ते पुरोहित आहेत.
मरणोत्तर क्रिया विधीच्या संदर्भात काही हिंसक प्रकार आहेत ते थांबावेत म्हणून ते प्रयत्नशील आहेत. स्व. प.पू. ब्रह्मानंद स्वामींकडे ही आपली खंत त्यांनी प्रगट केली होती. धार्मिक विधीसाठी त्यांना आमंत्रण असले अन् अचानक कुणीतरी गचकले.. तर ते धार्मिक विधीसाठी दुसर्‍या पुरोहिताला पाठवतात व आपण मरणोत्तर क्रिया-कर्माला जातात. बिदागीची (दक्षिणा) त्यांनी कधीच आस धरलेली नाही. जे मिळेल ते आनंदाने स्वीकारतात.
१९८६ साली त्यांचा विवाह विभा हिच्याशी झाला. विभा ही प्रेमळ स्वभावाची असून घरी आलेल्या कुणाही माणसाचे ती हास्य वदनाने स्वागत करते. त्यांना एक पुत्र असून तो पदवीधर आहे. नोकरी करून पौरोहित्याचे कार्य त्याला चालू ठेवायचे आहे.
विश्वनाथ भांडणकर हे नुसते पुरोहित नाहीत तर चांगले बागायतदार आहेत. दूध उत्पादक आहेत. ते पुरोहित नसते तर कदाचित चांगले इंजिनियरही बनले असते, हे त्यांच्या एकूण कल्पकतेवरून कळून चुकते. डोंगरावरचे पाणी मोठ्या कुशलतेने त्यांनी आणले आहे. अनेक ग्रंथांचे वाचन त्याचबरोबर भौगोेलिक परिस्थितीचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांच्या मुखकमलाकडे पाहिले तर मनाला प्रसन्नता वाटते. गर्व नाही. दुसर्‍यापोटी असलेला आदर, जिव्हाळा पाहिला म्हणजे पाहणारा आपोआप नतमस्तक होतो. अशी ही वल्ली प्रसिद्धीमाध्यमापासून दूर आहे. त्यांच्या कार्याची दखल वर्तमानपत्रातून घेण्यात आली नसली तरी अनेक ठिकाणी अनेक सत्कार-गौरव झालेले आहेत.
सिद्धारूढ संप्रदाय-हुबळी, भागवत सप्ताह-आडपई, अंत्रूज शिगमोत्सव-फोंडा, चिखोलकार राम संस्था, सिद्धारूढ क्रिएशन्स विजयदुर्ग संस्था केरी-फोंडा, ३६ वे कीर्तनकार संम्मेलन, रवळनाथ पंचायत देवस्थान तळावली, साई शांता साई मंडळ-दुर्भाट, महालसा नारायणी संस्थान (हरीकंटीके-उडपी), परमानंद वाडी महाराष्ट्र आदी ठिकाणी भांडणकर यांचा गौरव झालेला आहे.
अशा या गुणी पुरोहिताला चांगले आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे अशी प्रार्थना!

STAY CONNECTED

844FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

दीपिका व सारा मुंबईला रवाना

>> एनसीबीद्वारे मुंबईत आज व उद्या होणार चौकशी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावल्यानंतर अभिनेत्री सारा अली खान व दीपिका...

आत्मनिर्भर?

येत्या गांधी जयंतीपासून गोव्यामध्ये ‘आत्मनिर्भर गोवा’ मोहीम राबवण्याची घोषणा सरकारने नुकतीच केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भरते’च्या हाकेनुसार राज्य सरकार फार मोठे...

नवे ६७३ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू

>> एकूण रुग्णसंख्या ३० हजारांपार राज्याने कोरोना पॉझिटिव्ह एकूण रूग्णाचा ३० हजाराचा टप्पा काल पार केला आहे. राज्यात नवे...

कृषी विधेयकांविरोधात कॉंग्रेसचा सोमवारी राजभवनावर मोर्चा

>> राज्यपालांकडे निवेदन देणार गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या तीन कृषी दुरुस्ती विधेयकांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला...

एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

कोरोनाची बाधा झाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आलेले प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. कोरोना...

ALSO IN THIS SECTION

बेलगाम कोरोना….

डॉ. राजेंद्र साखरदांडे लोक एवढे घाबरलेत, बिथरलेत की वेडे व्हायचे राहिलेत. माझ्या मते वर्षभरात हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयविकार, वेडेपणा,...

मला भावलेले अनिल बाब

कामिनी कुंडईकर विधिलिखित चुकत नाही हेच खरे. ५ सप्टेंबर रोजी बातमी येऊन धडकली की ‘अनिलबाब गेले’. विश्वासच बसेना....

‘अधिकस्य अधिकं फलम्’

नारायण बर्वे, वाळपई यावर्षी अधिकमास १८ सप्टेंबर २० ते १६ ऑक्टोबर २० पर्यंतच्या कालावधीमध्ये येत आहे. आपणही अधिकमासाची,...

महालय श्राद्ध ः समज/गैरसमज

नारायणबुवा बर्वे आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची थोर परंपरा चालू ठेवणे फार गरजेचे आहे. म्हणून आपण सर्वांनी महालय श्राद्ध...