मये येथे घर फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास

0
126

गोसावीवाडा मये येथे अज्ञात चोरट्यांनी घराचा पुढील दरवाजा तोडून ४ लाखांचा ऐवज तसेच ५० हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याने या भागात खळबळ माजली आहे. ही घटना काल रात्रीच्या वेळी घडली. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला असल्याचे सांगण्यात आले. प्रतीक्षा रमाकांत गोसावी या घरात पती नसल्याने घर बंद करून आपल्या दुसर्‍या घरात गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी पुढील दरवाजाचा स्क्रू तोडून कडी तोडली व कपाटातील सोने तसेच ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. बांगड्या, हार, मंगळसूत्र, कानातील वस्तु व अंगठी मिळून साडेतीन लाखांचे दागिने व ५० हजाराची रक्कम लंपास केली.