Home बातम्या मनिषा केतकर खूनप्रकरणी पतीला अजून अटक नाही

मनिषा केतकर खूनप्रकरणी पतीला अजून अटक नाही

0
दोडामार्ग येथील मनिषा केतकर या महिलेच्या खून प्रकरणातील संशयित तथा या महिलेचा पती मनोहर केतकर याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच या महिलेचा शवविच्छेदन अहवालही अद्याप मिळालेला नाही. मनिषा केतकर हिचा लाडफे येथे आणून गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.

तिचा खून केल्याचे तिचा पती मनोहर याने स्वत:च पोलिसांना कळविले. मात्र अद्याप त्याला अटक झालेली नाही. पोलिस इफ्फी महोत्सवाच्या बंदोबस्तात गुंतल्याने त्याला अटक झाली नसल्याची चर्चा आहे.