Home बातम्या मध्यवर्ती ग्रंथालयाची वाचकसंख्या १८९६७ वर

मध्यवर्ती ग्रंथालयाची वाचकसंख्या १८९६७ वर

0

मध्यवर्ती ग्रंथालय (सेंट्रल लायबरी) पाटो-पणजी येथे हलविण्यात आल्यानंतर वाचकांच्या नोंदणीत प्रचंड वाढ झाली असून ती ८ हजारांवरून १८९६७ वर पोचली आहे. त्यात बाल वाचकांची संख्या ७३९ आहे. गेल्या १५ महिन्यांपूर्वी म्हणजे २३ एप्रिल २०१२ रोजी या ग्रंथालयाचे पाटो येथे स्थलांतर झाले होते.

या कृष्णदास श्यामा ग्रंथालयात प्रतीदिनी किमान ३०० लोक भेट देतात. आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रंथपाल कार्लुस फर्नांडिस यांनी सांगितले. रविवारीही पालक आपल्या मुलांना घेवून ग्रंथालयात येतात. राष्ट्रीय व स्थानिक मिळून २७ वर्तमानपत्रे तर २५० नियतकालिके उपलब्ध आहेत. स्पर्धात्मक परिक्षांसाठी लागणार्‍या पुस्तकांची संख्या ५०० इतकी असल्याचे सांगण्यात आले. स्मार्ट कार्डांच्या माध्यमातूनच ग्रंथ व्यवहार होत असल्याने चांगली सोय झाली आहे. दृष्टीहिनांसाठी ब्रेल लिपीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.