मध्यप्रदेशात आजच बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांचा आदेश

0
118

>> भाजपच्या याचिकेवर आज सुनावणी

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून आजच मंगळवारी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे. कमलनाथ सरकारने आज बहुमत सिद्ध केले नाहीते सरकार अल्पमतात जाणार आहे.

काल मध्य प्रदेश विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे अध्यक्ष प्रजापती यांनी करोनामुले विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित केली. त्यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली.

गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या
आमदारांचा राजीनामा
दरम्यान, गुजरातमध्ये कॉंग्रेसला झटका बसला आहे. गुजरातमधील कॉंग्रेसच्या चार आमदारांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. या चारही आमदारांचा राजीनामा विधासभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे.