मतदानासाठी ओळखपत्र अनिवार्य

0
73
दि. १२ रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यास येणार्‍या प्रत्येक मतदाराला निवडणूक आयोगाने वितरित केलेले छाया ओळखपत्र सादर करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. ज्या मतदारांना आयोगाने दिलेले ओळखपत्र सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनी पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, राज्य, केंद्र किंवा सार्वजनिक कंपन्यांनी वितरित केलेले ओळखपत्र, बँक पासबूक, टपाल खात्याचा पासबूक, पॅनकार्ड, आधार कार्ड, निवृत्ती वेतन विषयक दाखले किंवा फोटो वोटर पावती यापैकी एक दाखला सादर करावा लागेल.

मतदानापूर्वी सर्व मतदारांना फोटो मतदार स्लिप वितरित करण्याची व्यवस्था केली जाईल. ज्या मतदारांना वरील स्लिप मिळालेली नसेल त्यांची सोय मतदान केंद्रावर केली जाईल, असे संयुक्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले.