लोकसभेसाठी काल झालेल्या दुसर्या टप्प्यातील निवडणुकीत मणिपुरमधील एका जागेसाठी ८० टक्के मतदान झाले. तर नागालँड व मेघालयात अनुक्रमे ७१ व ६६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मणिपुरमधील दुसर्या जागेसाठी येत्या १७ रोजी मतदान होणार आहे. नागालँडमधील एकमेव मतदारसंघासाठी काल ७१ टक्के मतदान झाले.
मेघालयमधील दोन मतदारसंघांसाठी मात्र तुलनेने कमी मतदान झाले. संध्या. ५ वा. पर्यंत तेथील बहुतेक मतदान थांबविण्यात आले होते. तोपर्यंत ६६ टक्के मतदान नोंदले गेले. तेथे लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा हे एक प्रमुख उमेदवार आहेत.

