मडगाव व साखळीत कोरोना रुग्णांसाठी खास वॉर्ड ः राणे

0
123

मडगाव येथील टीबी हॉस्पिटल आणि साखळी येथील सामाजिक आरोग्य केंद्रात कोरोना रूग्णासाठी प्रत्येकी १० खाटांचे खास वॉर्ड तयार करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. देशातील काही भागात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने राज्य सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्य सचिवांनी खास बैठक घेऊन राज्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. या बैठकीला पर्यटन, बंदर कप्तान, शिक्षण, जिल्हाधिकारी व इतर कार्यालयातील अधिकारी, भारतीय वैद्यकीय संघटनेचे पदाधिकारी व इतरांनी उपस्थिती लावली.